
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
भाडपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर राज्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी वर्णी लागली आहे.

केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये भाजपाने 13 राष्ट्रीय सचिवांच्या नावाची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नाव आहेत. आंध्र प्रदेशातून सत्या कुमार, दिल्लीतून अरविंद मेनन, पंजाबमधून नरेंद्र सिंह रैना, राजस्थानातून अल्का गुर्जर, पश्चिम बंगालमधून अनुपम हाजरा, मध्य प्रदेशातून ओमप्रकाश धुर्वे, बिहारमधून ऋतुराज सिन्हा, झारखंडमधून कामख्या प्रसाद तासा, उत्तर प्रदेशातून सुरेंद्र सिंह नागर आणि केरळमधून अनिल एंटनी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं आहे.
