गव्याच्या हल्ल्यात मणदुर येथील तरुण जखमी

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे मणदुर: येथील पाटील वाडी मधील केरबा मारुती पाटील वय 34 या तरुणास गव्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाली.

केरबा मारुती पाटील हे शेतामध्ये वैरण काढण्यासाठी गेले असता पाठीमागून येऊन त्यांच्यावर गवा रेडयाने हल्ला केला . यामध्ये श्री केरबा मारुती पाटील हे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली .त्यांना कोल्हापूर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .

मणदूर येथे गवाचा वावर कायमचाच आहे . या हल्ल्यामुळे मनदूर गावातील लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत . यावर प्रशासनाने वेळीच कायमस्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे आहे .

🤙 8080365706