अन्नाबद्दलची लालसा याविषयी तुम्हाला माहित आहे का?

आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटत आहे’, किंवा ‘जेवणानंतर मला काहीतरी गोड लागतंच’ असं आपल्या बऱ्याच वेळेस कानावर पडतं. फूड क्रेव्हिंग किंवा अन्नाबद्दलची लालसा याविषयी आपण जाणून घेऊयात.

चॉकलेट केव्हिंग

बऱ्याच वेळेस शरीराला मॅग्नेशियम या खनिजाची गरज असते. आपल्याला मॅग्नेशियम हे कोको सीड्सपासून मिळते. म्हणून चॉकलेट खाण्याची इच्छा जागृत होते.

उपाय : आहारात वेगवेगळ्या तेलबियांचा वापर करावा.

जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा

बऱ्याच वेळेस दोन जेवणांमध्ये वाढलेले अंतर, अपुरा आहार, अपुरी झोप, ताण यामुळे शरीरामध्ये क्रोमियम, फॉस्फरस यासारख्या खनिजांची कमतरता, हॅपी हार्मोन सिरोटोनिनची कमतरता होते.

उपाय : वेळच्या वेळी सकस आहार व योग्य झोप.

ब्रेड, बेकरीचे पदार्थ खाण्याची इच्छाकमी व अपुरे खाणे, उपासमार यामुळे शरीरामध्ये नायट्रोजनची कमतरता निर्माण होते व त्यामुळे वरील पदार्थ खावेसे वाटतात.

उपाय : नट्स, सीड्स, पालेभाज्या, जीवनसत्त्वे देणारी फळे आहारात घ्यावी.

🤙 8080365706