राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अपमानाच्या निषेधार्थ उद्या आंदोलन

कोल्हापूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक विधान करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून आलेल्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक 29 जुलै 2023 रोजी सकाळी १०-३० वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय स्टेशन रोड येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

सदर आंदोलनामध्ये आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयश्रीताई चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.

तरी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते ब्लॉग अध्यक्ष युवक काँग्रेस,सेवादल, महिला काँग्रेस, ओबीसी सेल, ग्राहक संरक्षण सेल, परिवहन सेल, माजी सैनिक सेल, अपंग सेल, घरेलू कामगार सेल, व इतर सर्व प्रमुख सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजर राहणे अनिवार्य आहे तरी सर्वांनी या आंदोलनासाठी उपस्थित राहावे राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले आहे.

🤙 8080365706