
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

दिल्लीतील विशेष न्यायालयाने कोळसा घोटाळा प्रकरणी मोठा निर्णय दिला होता. दिल्ली न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील प्रकरणात माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवत विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.या प्रकरणात आता दिल्ली उच्च न्यायालयाने विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला अंतरिम जामीन दिला आहे. त्यामुळे त्यांना जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी किमान दोन महिन्यांचा दिलासा मिळाला आहे. दर्डा कुटुंबाला सीबीआयच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.
