
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेषः आज रोजगारात योगकारक दिवस आहे. आर्थिक लाभासह मानसिक सुखशांती लाभेल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल.
वृषभः आज दैवी साथ लाभणार आहे. नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल.
मिथुनः आज वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. अनिष्ट दिवस असणार आहे. घातपातच भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे.
कर्कः आज समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे.
सिंहः आज नोकरीत ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. व्यापारात देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील.
कन्या: आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. आपल्या कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल.
तूळ आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
वृश्चिकः आज आपणास रोजगारात यश मिळाल्याने आंनदी राहाल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
धनुः आज नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.
मकरः आज नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. व्यापारी वर्गकरीता महत्वाचा योग. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभः आज प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.
मीन: आज नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय सेवेतील नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
