
प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील महापुराचे पाणी आज गुरुवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढले. आज दिवसभरात पावसाची संततधार शिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल अशी धास्ती पूरग्रस्तांना होती मात्र अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग चालू असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली नाही. त्यामुळे पूरगंस्थाना दिलासा मिळाला. तरीही आज दिवसभर असलेल्या पावसामुळे परिणामी राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पुढील 24 तासात पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने चिखली परिसरात पुराचा धोका कायम आहे.

दरम्यान सध्या तरी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयाग चिखली परिसरातील मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आलेले नाही. गावाचा संपर्क रात्री उशिरापर्यंत चालू होता. दोन फुटाने पाण्याची पातळी वाढली तर प्रयाग चिखली गावास बेटाचे स्वरूप प्राप्त होईल. अशी शक्यता आहे त्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. चिखली आंबेवाडीतील अनेक कुटुंबांनी ऐनवेळी स्थलांतर करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासनाने मात्र कोणतीही जोखीम न घेता वेळीच स्थलांतर करावे अशा सूचना गावांमध्ये दिल्या असल्यास ची माहिती सरपंच रोहित पाटील यांनी दिलीफोटो ओळी …क्षेत्र प्रयाग चिखली ठिकाणी मुख्य रस्त्यावर लगत वाढलेले पुराचे पाणी… या ठिकाणी कोणत्याही क्षणी पाणी रस्त्यावर येऊ शकते
