
कोल्हापूर : बालिंगे पुलावरून सुरक्षिततेच्या कारणावरून गेले तीन दिवस बंद असलेला कोल्हापूर -गगनबावडा रस्ता आजपासून सुरू करण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी परवानगी दिल्याची माहिती करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

माजी आमदार नरके यांनी बुधवारी रात्रीपासून पालकमंत्री केसरकर यांच्याशी सातत्याने संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील जनतेची रस्ता बंद होत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेऊन हा रस्ता त्वरित सुरू करण्याची करण्यास परवानगी दिली आहे अशी माहिती नरके यांनी दिली आहे.
