आमदार ऋतुराज पाटील यांची तत्परता : खासबाग येथील दुर्घटनास्थळाची पाहणी; जखमीची विचारपूस

कोल्हापूर : खासबाग कुस्ती मैदान येथे सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस दगडाची भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याबाबत या घटनेची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तसेच जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करून धीर दिला.कोल्हापुरातील खासबाग मैदानामध्ये काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील डाव्या बाजूची भिंत पडल्याची दुर्घटना घडली या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेत सापडलेल्या दोन महिलांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून सीपीआर येथे दाखल केले. या घटनेची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांना मिळतात ते घटनास्थळी दाखल झाले. आमदार ऋतुराज पाटील यांनी खासबागच्या पडलेल्या भिंतीची पाहणी करून उपस्थित कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या तसेच तात्काळ सीपीआर मध्ये जाऊन जखमींची विचारपूस करून जखमीच्या नातेवाईकांना धीर दिला. पावसामुळे खासबाग मधील भिंत पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे .

🤙 8080365706