
बहिरेश्वर प्रतिनिधी : मौजे बहिरेश्वर येथील आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने कारगील विजय दिनाच्या निमित्ताने शहीद जवान दीपस्तंभाला पुष्पगुच्छ वाहत आदरांजली वाहिली. तद्नंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळली .राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

जूलै 1999साली श्रीनगर आणि लेह लदाक दरम्यान असणा-या रस्त्यावर पाकिस्तान सैनिकांनी अचानक घुसखोरी केली होती.त्यावेळी भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन विजय अमलात आणून चोख प्रत्युत्तर दिले. व 27जूलै रोजी भारतीय ध्वज कारगील मध्ये उभा करून विजय साजरा केला. पण या युद्धात भारतीय लष्करातील जवळपास 500 सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व शहीद झाले तर 1500 च्या वर सैनिक जखमी झाले त 26जूलै 1999 पासून भारतामध्ये शहीद जवानांच्या आदराप्रित्यर्थ कारगील विजय दिन साजरा केला जातो.
