
गवती चहा घालून केलेला चहा पावसाळयात आपण सहज करतो आणि आपल्याला ताजतवानं वाटतं. काही हौशी लोक घरातल्या कुंडीत गवती चहा उगवतात. ह्याच गवती चहाचे चे फायदे जाणून घेऊयात.

गवती चहा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक नैसर्गिक सूत्र आहे. पोटॅशियमने गवती चहा समृद्ध आहे जो आपल्या शरीरात मूत्राच उत्पादन वाढवतो, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होत आणि रक्तदाब कमी होतो. ज्याने यकृत शुद्ध करण्यात मदत होते. गवती चहा आतड्यांमधून कोलेस्टेरॉलचे शोषण करतो म्हणून देखील ओळखला जाते, जेणेकरून संपूर्ण हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
गवती चहामध्ये असलेल्या फॉलिक ॲसिड, तांबे, थायमिन, लोह, जस्त सारख्या पोषक तत्त्वांमुळे हा फायदा होतो. ह्या पातींमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि औषधी गुणधर्म देखील आहेत. दररोज 30 दिवसांपर्यंत गवती चहा पिण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन,पॅक पेशींच प्रमाण आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढू शकते. मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात ? खुशाल गवती चहा घालून चहावर चहा पिऊ शकता. !
गवती चहा एक नैसर्गिक लघवीच प्रमाण वाढवणवणारा पदार्थ आहे, जर आपण रोज गवती चहा प्याल तर आपण काही किलो वजन नक्की कमी करू शकता.आपण वजन कमी करण्यासाठीं जेवण बदलतो, आपली लाईफ स्टाईल बदलतो पण चहाचा एक कप बदलून पहा. गवती चहा प्या वजन कमी करा.
