
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपये खर्चातून जुना वाशीनाका परिसरात नव्याने होणाऱ्या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

जुना वाशी नाका परिसरातील राजकपूर पुतळा येथील जुनी ड्रेनेज लाईन खराब झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परीसरातील अनेक घरात पाणी शिरते. त्यामुळे नव्याने ड्रेनेज लाईन नव्याने करण्याची मागणी सातत्याने होत होती. आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांच्या प्रयत्नातून या परिसरातील ड्रेनेज लाईनसाठी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या नव्या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित स्थानिक महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी परिसरातील कदम खण आणि इतर भागाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशीही त्यांनी संवाद देखील साधला.
यावेळी माजी नगरसेवक सचिन चव्हाण, उद्योजक सत्यजित जाधव,शहर अभियंता हर्षजीत घाटगे, दिग्विजय मगदूम अमर जरग,मॉन्टी मगदूम,मधुकर गवळी,दीपक पिराळे,यासीन शिकलगार,सोनू पाटील,सोनाली चव्हाण,मनीषा पिराले,सुरेखा सुतार, कमल केसरकर,अनिता पाटील रंजना शिंदे यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
