
मुसळधार पावसातही श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोटला अफाट जनसागर
कोल्हापूर : धो धो पडणारा मुसळधार पाऊस. कोल्हापूर जिल्ह्याला पुराने विळखा घातला असतानाही सोमवारी (ता.२४) रंकाळा जवळील दत्त मंगल कार्यालयात अक्कलकोट समाधी मठातील श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य वापरातील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांचा जनसागर लोटला होता. रात्री साडेबारा वाजेपर्यंत भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नित्य वापरातील पादुकांचे दर्शन घेतले. न भुतो न भविष्यते अशी गर्दी होऊन ,आजवर झालेल्या कार्यक्रमाचा आजच्या गर्दीने उच्चांक मोडला. समर्थ फाउंडेशन व कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने स्वामी भक्तांचा महासोहळा आयोजित केला होता.

केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे, तर सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून स्वामी भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित लावली. स्टेजवर स्वामी समर्थांची सजवलेली भव्य मूर्ती, पाना फुलांनी केलेली आरास व अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा व नेत्रदीपक प्रकाश योजना त्यामुळे कार्यक्रमात वेगळाच रंग भरत होता. पारंपारिक वाद्यांच्या गजरात, हलगीच्या निनादात कार्यक्रम स्थळी अतिथींचं आगमन होत असताना त्यांच्यावर झालेली पुष्पृष्टी व स्वामी समर्थांच्या नामाचा जयघोष या साऱ्या गोष्टीने संपूर्ण वातावरण स्वामीमय बनले होते. त्या पाठोपाठ अक्कलकोट वरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आल्या, त्यावेळी उपस्थित सर्वांनीच फुलांचा वर्षाव केला. यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पंडित विद्याकर गुरुजी, पुण्याच्या ज्येष्ठ स्वामी अभ्यासिका व व्याख्यात्या श्रीमती विजयालक्ष्मी शिरगावकर, संत तुकारामाचे ११ वे वंशज व पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषद चे अध्यक्ष प्रशांत महाराज मोरे देहूकर, कार्यक्रमाचे संयोजक सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तुरे, रमेश चावरे, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आर. आर. पाटील, उद्योजक नितीन वाडीकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वामींची प्रतिमा, वस्त्र अलंकार व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी स्वामी भक्तीचा अगाध महिमा दाखवणारी ब्रह्मांडनायक हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा प्रत्येक वर्षी काढली जाते या पदयात्रेमध्ये अनेक भक्तांना आलेले स्वामींचे अनुभव व साक्षात्कार या अनुभवावरच श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा हा चित्रपट काढण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमेश सुग्रीव चावरे व मनोज शिवाजी साळुंखे निर्मित श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा या चित्रपटाचा शुभारंभ झाला कथा सुहास रामचंद्र पाटील यांची आहे. पटकथा संवाद दिग्दर्शन निलेश गणेश जाधव यांची आहे. स्वामी भक्तांनी खचाखच भरलेले सभागृह पाहून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनीही स्तुती सुमने उधळलीत. कार्यक्रमाचे आयोजक सुहास पाटील यांनी नेटके नियोजन केले होते.

यामध्ये योग पंडित सुनिता काकासाहेब मानगावे, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठ गंगावेश सर्व विश्वस्त, दत्त भिक्षालिंग मंदिर ट्रस्ट, बिंदू चौकचे पुजारी बाळासाहेब जनार्दन दादरने, स्वामी समर्थ सेवा समूह जवाहरनगरचे राजेंद्र तुकाराम खैरमोडे, निर्माण कन्स्ट्रक्शन चे अरुण भैरू पाटील, रत्नागिरीचे शेखर कवितके, त्रिमूर्ती भक्त मंडळाचे रामचंद्र बापूसाहेब जगताप, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ मगरमठ्ठी चे श्रीकांत शंकरराव मगर, मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर संगीता निंबाळकर, सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक जगमोहन भुरके, सहाय्यक सचिव मनोज पांडुरंग माने, कंदलगावचे वसंत जीवबा पाटील, वडगाव चे एडव्होकेट प्रशांत शिंदे, चोकाचे डॉक्टर अविनाश बनगे, हरी ओम नगर मधील दीपक सपाटे, सोलापूर जिल्ह्यातील वाढेगावचे समाधान शंकर खटकाळे, वाशीचे आनंदा बाळू शेळके, दुर्गमानवाडचे उपसरपंच बाजीराव अंतू पाटील, श्री स्वामी समर्थ मंदिर महाद्वार महाद्वार रोड येथील पुजारी सौ. निर्मला दत्तात्रय जाधव, राष्ट्रीय नेमबाजी खेळाडू युवराज तुकाराम चौगुले, व्हन्नुरचे दिलीप भुपाल चौगुले, शिरोली पुलाचे सचिन आनंदराव कागले, ब्रम्हांडनायक चित्रपटाचे निर्माते मनोजकुमार शिवाजी साळुंखे, कासेगावचे अमित कुलकर्णी, गणेशवाडीचे लक्ष्मण रामचंद्र मेढे, आपत्कालीन तज्ञ प्रशिक्षक ओमकार राजीव नवलीहाळक, नागजचे रमेश शिवाजी रुपनर, साने गुरुजी वसाहत मधील गजानन शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील मुरलीधर शामराव बारापात्रे, वास्तुशास्त्र आणि अंक शास्त्रज्ञ अमित चंद्रकांत रामपुरे ,म्हारुळचे विजय हिंदुराव शिंदे, संगीत विशारद महेश चंद्रशेखर हिरेमठ , गणेश वाडीचे अनिल लक्ष्मण माने, पडळचे रामचंद्र गोपाळ पवार, कालिकापुरम मधील वेणू उमेश सुतार, कळंबा येथील विना प्रशांत रेळेकर, मुंबईच्या प्रियांका सुंदर नाडर, सांगरूळ ता. करवीर मधील श्री दत्त गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, आरळे ता. पन्हाळा येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ , इंगळी ता. हातकणंगले मधील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, आर्टिस्ट गणेश जोशी, देवाळेचे रक्तदाते संदीप पाटील यांचा समावेश आहे.
प्रा. प्रकाश सुतार व आळंदीचे चंद्रकांत डांगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ फौंडेशनचे अध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे संस्थापक रमेश चावरे, नगरसेविका प्रतिज्ञा महेश उत्तुरे, स्वामी भक्त मनोज माने, कुलदीप जाधव, विजय खानविलकर, वेणूताई सुतार, विनाताई रेळेकर, अश्विनी मुरचुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
