
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती खालावल्यामुळे आज (मंगळवार) सकाळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.शिरीष कणेकर यांची ओळख शैलीदार लेखक, फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे वक्ते अशी होती. वृत्तपत्रांमध्ये सिनेमा, क्रिकेट, राजकारण यावर त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. तसंच कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन यातून त्यांनी विनोदी लेखनही केलं.
