
प्रयाग चिखली / वार्ताहर : प्रयाग चिखली आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांना पुरेसे भूखंड देऊन पूर्ण क्षमतेने पुनर्वसन करण्याबरोबरच पूरग्रस्तांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शासनाकडून पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण निश्चित करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

प्रयाग चिखली येथील पूरग्रस्तांच्या भेटी प्रसंगी सभेत केलेकरवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आंबेवाडी गावांना नेहमीच पुराचा सोसावा लागतो चालू वर्षीही या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे त्यानिमित्त गावकऱ्यांना दिलासा म्हणून आणि पुराच्या परिस्थितीची पाहणी करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सायंकाळी प्रयाग चिखली आंबेवाडी गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी केली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच उपायोजनाबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाला कमान टाईप मोरया बांधणे आणि सोनतळी येथे पूरग्रस्तांचे पूर्ण क्षमतेने पुनर्वसन करणे याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना सविस्तर बैठक घेण्याबाबत आदेश दिले तसेच पूरग्रस्तांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे अभिवचन ही दिले.यावेळी करवीर चे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रयाग चिखली पुनर्वसनाबाबत च्या समस्या आणि त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने कराव्यात याबाबत पालकमंत्री यांना सविस्तर माहिती दिली.
चिखलीचे रघुनाथ पाटील तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक- एस आर पाटील यांनी चिखली ग्रामस्थांना भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली.यावेळी प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित रघुनाथ पाटील यांनी पालकमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या विविध समस्या बाबत निवेदन दिले. यावेळी पूरग्रस्तांच्या वतीने भाजपाचे पै.संभाजीराव पाटील शिवाजी कवठेकर बटूसिंग रजपूत, धनाजी चौगले बळी कळके प्रभाकर पाटील उत्तम चौगले विठ्ठल कळके संपतराव दळवी अरुण मांगलेकर अमर पाटील पांडुरंग कळके आदींनी समस्या विशद केल्यायावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रांताधिकारी हरीश धार्मिक, करवीचे तहसीलदार स्वप्निल रावडे तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
