
मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे राष्ट्रवादी नेते अजित पवारांचा पर्याय आहे त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

येत्या 10 ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणूक पाहता दिली होईल, असेही चव्हाण म्हणाले.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री केलं जाईल, अस सातत्याने बोललं जात आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार का? अशीच चर्चा रंगली आहे.
