कोयना धरणातील पाणीसाठ्याने ओलांडला 50 टीएमसीचा टप्पा

सातारा : शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.

धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणी साठा वेगाने वाढत आहे.. सध्या धरणात 51.93 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर धरणात प्रतिसेकंद 59 हजार 851 क्युसेक इतकी आवक सुरू आहे. चोवीस तासात 4 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

त्यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. सध्या प्रतिसेकंद 60 हजार क्युसेक इतकी आवक सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीने वाढ झाली आहे. तसेच पाण्याची आवक 10 हजार क्युसेकने वाढली आहे.

🤙 8080365706