
मुंबई : अरबी समुद्रात यावर्षी निर्माण झालेल्या ‘बिपोरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याने तीव्र रुप धारण केले आहे. अशातच राज्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केल्याने त्याचा प्रभाव मुंबईच्या किनारपट्टीवरही दिसून आला. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.