त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं; छगन भुजबळ

नागपूर : “त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्याचं कारणही सांगितले. काय म्हणाले छगन भुजबळ? मी शिवसेना सोडून आलो ते ओबीसीसाठी.पवार साहेब ओबीसींचा विचार करत होते म्हणून मी त्यांच्यासीबत आलो. ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षते खाली समिती निर्माण झाली होती. त्यांनी डेटा तयार करावा लागेल, असं सांगितलं. पण झालं नाही. असेही ते म्हणाले.

पवार साहेबांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केलं. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा घेतला हे इतर पक्षात नाही. बाकी पक्षात फक्त नावाला ओबीसी सांगतात. मात्र, करणी वेगळी असते, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.