अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आलीय. सुलोचना लाटकर या ९४ वर्षांच्या आहेत.त्यांना उपचारासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सुलोचना या गेली काही महिने श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. सुलोचना या श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर गेले काही महिने शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरु होत आहेत.