
कोल्हापूर : गोकुळ माजी संचालक स्वर्गीय चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांच्या कार्याचा वारसा व सामाजिक बांधिलकी जपत अभिषेक बोंद्रे यांनी अनेक वेळा सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांची कन्या धृती हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृष्णानंद ट्रस्टच्या माध्यमातून बालकल्याण संकुल , कोल्हापूर येथे अनाथ, निराधार मुलांना भोजन व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्सचे चेअरमन अभिषेक सुभाष बोंद्रे , श्रीमती रमा सुभाष बोंद्रे, सौ.अरुंधती अभिषेक बोंद्रे, अनिल निकम , जनता कंझ्युमर्सचे संचालक डॉ. सुहास बोंद्रे ,बालकल्याण च्या पद्मजा तिवले,उद्योजक पृथ्वीराज निकम , राहुल दळवी ,अजित पाटील, अभिजित बोरगे, भिकाजी पाटील, दिलीप संकपाळ , तुषार एकशिंगे, योगेश माने आणि अभिषेक बोंद्रे युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
