
कोल्हापूर : आगामी काळात नवीन भाजपा कार्यालय लोकसेवेचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर मधील नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी पहिल्या समर्पित नवीन जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून भाजपाचे प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय असावे, असा आग्रह धरला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठीचे हे पहिले समर्पित कार्यालय आहे. संपूर्ण राज्यभरातून बैठकीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठीचे विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यालय पाहून आनंद व्यक्त केला. “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयचा मंत्र घेऊन, भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करत असतात. त्यामुळे आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल,” असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी महादेवराव महाडिक, सुहास लटोरे,राजे समरजित घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे सुजित चव्हाण, विठ्ठल पाटील, नाथाजी पाटील,हंबीरराव पाटील, ,झाकीर जमादार,आनंदा माळी,पोपट पुजारी,संजय पाटील ,सुनील मगदूम,राजवर्धन निंबाळकर,प्रकाश आवाडे,आनंदराव साने,गजानन सुभेदार,श्यामराव जोशी , अजित ठाणेकर,पृथ्वीराज पवार, महेश चौगले,अनिल देसाई, दत्तात्रय मेडशिंगे, अजय चौगले, संदीप देसाई, सुनील चव्हाण,बाळ पाटणकर, भूपाल कांबळे,महेश जाधव,नाना कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
