
नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या जंतर – मंतरवर झालेल्या प्रचंड गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन वसंत कुंज पोलीस ठाण्यात नेले आहे.

कलम 144 चे उल्लंघन केल्यामुळे आता हा संप येथे संपला आहे. दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे, मात्र आता कुस्तीपटू जंतरमंतरवर परत जाऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत पोलिसांनी आंदोलनाची जागा रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच कुस्तीपटूंचे तंबूही काढले जात आहेत.
