बिद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते……

बिद्री : बिद्री ता. कागल येथे पूर्णत्वास येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी, मंजुरी आणि त्याला अनुषंगिक निधी या सर्व बाबी आमदार हसन मुश्रीफ यांच्याच प्रयत्नातून झाल्या आहेत. आमदार मुश्रीफ यांच्या हस्तेच या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होईल, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

फराकटे यांनी या पत्रकात म्हटले आहे, एनआरएचएम योजनेअंतर्गत बिद्री -बोरवडे, हमीदवाडा, हळदी ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आमदार हसन मुश्रीफ यांनी बृहद आराखड्यामध्ये घालून प्रयत्न केले होते. त्यापैकी बिद्री येथे मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र १८ मार्च २०१८ रोजी निविदा काढून वर्कऑर्डर देण्यात आली होती. दरम्यान; अलीकडेच कोणीतरी जाऊन पाहणी करून आपल्याच प्रयत्नाने झाल्याचा भास निर्माण करीत आहेत. त्यांचा त्यावेळी राजकीय जन्मही झालेला नव्हता. अशा स्टंटबाजीची जनतेनेही दखल घेण्याची गरज नाही.

आमदार हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधींची विकासकामे केलेली आहेत आत्ता कुठेतरी त्यांना तुकड्या -तुकड्यांनी मिळत असलेला निधीही खर्च करण्यासाठी जागा नाही, एवढी विकासकामे आमदार मुश्रीफ यांनी केलेले आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात इतर मतदारसंघातील किंवा पर जिल्ह्यातील कुणीही पाहूणा किंवा नातेवाईक आला तर ही विकासकामे बघून आमदार असावा तर हसन मुश्रीफ यांच्या सारखा, अशी प्रतिक्रिया देतो. यातच मुश्रीफ कामाचे गमक आहे, असेही फराकटे यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706