कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टाय ब्रेकरवर दिलबहारने फुलेवाडीचा ४-२ ने पराभव करून, उपांत्य फेरीत प्रवेश केला.
श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याची सुरुवात माझी नगरसेवक ईश्वर परमार, रियाज सुभेदार, अश्कीन आजरेकर, संभाजीराव बसूगडे, क्रीडायचे अध्यक्ष के. पी. खोत, सचिव संदीप मिरजकर, जाफर मलबारी, याकूब चौधरी, सागर गायकवाड, संदीप पाटील ,इर्शाद थोडगे, सुमित पंडित, रवीकीरण गवळी, राजू जाधव, संग्राम मेढे, संग्राम साळुंखे, मतीन बोधले यांच्या प्रमुख उपस्थित झाली.दिलबहार विरुद्ध फुलेवाडी क्लब यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात १६ व्या मिनिटाला राहुल तळेकर यांने गोल केला.
मध्यंत्तरापर्यंत दिलबहारने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ६६ व्या मिनिटाला फुलवाडीच्या अजय जाधव याने गोल करून, सामन्यात बरोबरी केली. संपूर्ण वेळेत हा सामना १-१ असा बरोबरीत राहील. त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर वरती ठरवण्यात आला. टाय ब्रेकरवर दिलबहारने फुलेवाडीचा ४-२ पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू दिलबहारच्या राहुल तळेकरची निवड झाली. खेळाडूला अनिल शिंदे चोपदार व आनंद माने यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. उदय अतिग्रे, बाजीराव मंडलिक यांच्या हस्ते भाग्यवान प्रेक्षकांची कुपन काढण्यात आली. यावेळी कृष्णा पाटील (बुधवार पेठ), अमर जीतकर (पाचगाव) या प्रेक्षकांना गिफ्ट कुपन देण्यात आले.चंद्रकांत चषक मध्ये महिला व पुरुष प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ द्वारे भाग्यवान प्रेक्षकांना विशेष गिफ्ट कुपन देण्यात येणार असल्याचे आयोजक व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.