गुलाबराव घोरपडे एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता
शाहू वाचनालय गारगोटी येथे शोकसभा

गारगोटी : गुलाबराव घोरपडे हे काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ पदावर होते त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे फार निकटचे संबंध होते आज काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये गुलाबराव यांच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याची गरज होती त्यांच्या अकाली निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात काॅंग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.

शाहू वाचनालय गारगोटी येथे सर्वपक्षीय शोकसभा भरलेली होती. याचवेळी गारगोटीतील सुप्रसिद्ध एडवोकेट के एस पाटील यांचे काल दुःखद निधन झाले त्यांनाही सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.भुदरगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, म्हणाले त्यांचे आम्हाला मार्गदर्शन केले.सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांला हरवलो . प्रकाश देसाई टी एस पाटील,गुरव,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जेष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांनी सांगितले की गुलाबराव घोरपडे यांनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कायदा पारित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही त्यासाठी हायकोर्ट मध्ये दाद मागण्याविषयीची आपल्याबरोबर त्यांच्या निवासस्थानी अलीकडे चर्चा केली होती पूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष होते सर्वच पक्षांच्या नेत्याशी त्याचे चांगले संबंध होते.