कोल्हापूर : हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरील उंचगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील जीवघेणा खड्डा अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवला.
हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरील उंचगाव जवळील कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर मोठा खड्डा पडला होता.मुडशिंगीहून हायवे ब्रिजखालून येताना चढ लागतो त्यामुळे हा खड्डा वाहनधारकांना दिसत नव्हता यामध्ये वाहने जोरात आढळत होती. गाडीमागे बसलेल्या अनेक महिला पडलेल्या आहेत. अनेकांचे मोबाईल सुद्धा या खड्यामध्ये पडून फुटलेले आहेत. येथे दररोज तीन चार अपघात होत होते. यामुळे शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सा.बां.विभागाचे शाखा अभियंता परशुराम नंदीवाले व श्रीकांत सुतार, संजय माळी या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार करून तेथील परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
याची दखल घेत सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर तो खड्डा मुजवून घेतला. याबाबत परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.