
पुणे : महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी आणि भाजप- शिवसेना युतीसोबत जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढणार असून इतर 42 जागा समविचारी लोकांसोबत लढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी राहिला असताना राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढची भूमिका काय असणार ,स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार की युती करणार? याविषयी राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने महाराष्ट्रात एंट्री केली असून त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रात त्यांच्या सभेला यापुढे जर प्रतिसाद वाढला तर कोणालाही नवल वाटायला नको, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
