राज्यातील तीन हजार ४२७ शाळांना २० टक्के अनुदान

सोलापूर : राज्यातील तीन हजार ४२७ विना अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना २० टक्क्यांचा अनुदानाचा टप्पा मंजूर झाला आहे. त्यामुळे ६३ हजार १८० शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दूर होणार आहे.

२८ मार्चपासून संबंधित शाळांना वाढीव अनुदानाचे आदेश दिले जाणार आहेत. त्यात १५ हजार ५७१ तुकड्यांचा समावेश आहे.तरुण वयात शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर शाळेतील मुलांना शिकवता शिकवता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काही शिक्षक आले, पण २० टक्क्यांच्या अनुदानाचा टप्पा मिळाला नव्हता. त्यामुळे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील त्या सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची दखल घेत त्यांना अनुदानाचा टप्पा देण्याची ग्वाही दिली आणि काही दिवसांतच शासन निर्णय काढला. पण, आता अनुदान दिल्यानंतर २०२२-२३ ची संचमान्यता केली जाईल. 

News Marathi Content