भीषण स्फ़ोटाणे काबुल हादरले….

काबूल : अफगणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. काबुलमधील विदेश मंत्रालयाच्या रोडच्या ट्रेड सेंटरजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगणिस्तानमध्ये झालेल्या स्फोटाने काबूल हादरलं आहे. काबूलमध्ये स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अफगणिस्तानच्या तपासयंत्रणेने स्फोट कसा झाला, याचा शोध सुरू केला आहे. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.काबूलमध्ये झालेल्या स्फोटाची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. या स्फोटामागे आयएसआयएस-के या संघटना आहे,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.