बदलत्या काळानुसार निर्मितीक्षमतेवर भर देवून संघटना सक्षम करणे आवश्यक; माजी अध्यक्षांच्या चर्चेतील सूर

कोल्हापूर : प्रेस क्लबच्या वतीने माजी अध्यक्षांचा सन्मान कोल्हापूर : देशपातळीवरील प्रेस क्लब सारख्या संस्था स्वत:च्या कौशल्यातून अर्थकारण उभे करण्यावर भर देतात. त्याचप्रमाणे आपणही बदलत्या काळानुसार निर्मिक्षमतेवर भर देवून, आपली संघटना मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न करुया आणि आपला उत्कर्ष करून घेऊया, असा सूर प्रेस क्लब येथे झालेल्या माजी अध्यक्षांच्या चर्चेत उमटला.

दरम्यान पत्रकारांचे आरोग्य, विमा, घरकुल,पेन्शन या समस्या आजही तशाच आहेत. पत्रकार सन्मान योजनेसाठी कागदपत्रांतील सरकारी निकष अडथळे निर्माण करणारे आहेत.जर अशी कागदपत्रे आपणाला उपलब्ध करता येणे शक्य नसेल तर त्याचा विचार वैयक्तिक पातळीवर करावा याकडेही लक्ष वेधले गेले.पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब वास्तु प्रवेशाच्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून,आजपर्यंत कोल्हापूर प्रेस क्लब -च्या वाटचालीत अध्यक्षपदाची धुरा सांभाळले -ल्या माजी अध्यक्षांचा ऋतज्ञतापुर्वक सन्मान करण्यासह त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली‌.

यावेळी माजी अध्यक्ष व दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार,उदय कुलकर्णी तसेच जेष्ठ पत्रकार नाना पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोर संकपाळ, विजय कुंभार, लुमाकांत नलवडे, निवास चौगुले, विठ्ठल पटील, गुरुबाळ माळी, भारत चव्हाण ,विजय पाटील, मोहन मेस्त्री, राजेंद्र जोशी,अनिल देशमुख, दत्तात्रय बोरगे आदी कोल्हापूर प्रेस क्लबच्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान माजी अध्यक्षांनी दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या घरकुल,विमा यांसह ,पेन्शन योजनेचा पाठपुरावा करण्याची ग्वाही विद्यमान कार्यकारीणीच्यावतीने देण्यात आली.

तर जेष्ठ पत्रकार डॉ.विजय चोरमारे यांनी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत जेष्ठ व गरजू पत्रकारांना सन्मान योजनेसाठी जाहिर केलेल्या देणगीचेही स्वागत करण्यात आले.यावेळी कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष शीतल धनवडे,उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,सचिव बाबासाहेब खाडे,कार्याध्यक्ष दिलीप भिसे,खजिनदार पी‌.ए.पाटील,प्रसिद्धी प्रमुख अश्विनी टेंबे यांच्यासह संचालक समीर मुजावर,संग्राम काटकर,बाबुराव रानगे,भुषण पाटील,सचिन सावंत,मिथुन राज्याध्यक्ष,प्रमोद व्हनगुत्ते,सतीश घाटगे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706