
पुणे : राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

यामुळे शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे.राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून 1 जानेवारी 2023 पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.दरम्यान वाढीव मानधनानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये मानधन मिळणार आहे. तर माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 18 हजार रूपये तसेच उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे.
