
कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रतिलाल गेनाजी राठोड (वय ८२) यांचे आज निधन झाले.

त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या, रविवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजता महावीरनगर येथील घरापासून निघेल. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे खजानिस, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे माजी उपाध्यक्ष, जितोच्या कोल्हापूर विंगचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठोड यांचे ते वडील होते.
