गडहिंग्लज बाजार समितीला केडीसीसी शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा करेल : आमदार हसन मुश्रीफ

गडहिंग्लज: गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण आमदार हसनसाहेब मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण झाले. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेल्या या बाजार समितीला केडीसीसी बँक शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा करेल, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण आमदार मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. भाषणात

आमदार मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल गौरवास्पद आहे. या बाजार समितीला सर्वतोपरी सहकार्य करू.

आमदार राजेश पाटील म्हणाले, गेल्या अडीच- तीन वर्षात या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळांने केलेले काम गौरवस्पद आहे. या बाजार समितीच्या मालकीच्या शीतगृह उभारणीसाठीही प्रयत्न करू. शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डयाणवार म्हणाले, बाजार समितीचा पेट्रोल पंप आणि गोडाऊन झाले ही चांगलीच प्रगती आहे. तसेच; बाजार समिती आवारात वेअर हाऊस उभारणेही गरजेचे आहे. त्यामुळे शेतीमाल दरामध्ये मंदी असताना साठा करून ठेवणे तेजीमध्ये विक्री करणे सोपे होईल.

“कोल्डस्टोरेज उभारा……..”

आमदार मुश्रीफ म्हणाले, आपल्या मौल्यवान पिकाचे शेतकऱ्याने उत्पादन घेतल्यानंतर बाजारात मंदी असेल तर विक्री करताना शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते. त्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज ऊभारा. जेणेकरून मंदी असताना ते धान्य साठवून ठेवून व तेजी असताना विक्री केली तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल. यासाठी शेतीमाल तारणापोटी करावयाचा अर्थ पुरवठा केडीसीसी बँक करेल.

यावेळी सतीश पाटील -गिजवणेकर, रामाप्पा करीगार, विक्रमसिंह चव्हाण- पाटील, अभिजीत पानारी, राजेंद्र गड्यान्नवार, प्रकाश पताडे, अमर चव्हाण, मुकुंददादा देसाई, संभाजीराव भोकरे संभाजीराव पाटील, सोमगोंडा आरबोळे, विजय वांगणेकर, भिकू गावडे, धनाजी तोरस्कर आदीप्रमुख उपस्थित होते. स्वागत स्वागत मुकुंददादा देसाई यांनी केले. प्रास्ताविक माजी प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई यांनी केले. आभार शेखर येरटी यांनी मानले.

🤙 8080365706