
कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून वितरित करण्याचे तयारी असलेल्या चौघांना पोलीसानी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून बनावट नोटासह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

कळे पोलिस व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. चंद्रशेखर बाळासाहेब पाटील वय ३४ रा।कसबा तारळे, अभिजित राजेंद्र पोवार गडमुडशींगी ता.करवीर, दिग्विजय पाटील जयभवानी तालमीत समोर शिरोली पुलाची ता.हातकणंगले,संदीप बाळू कांबळे आंबेडकर नगर कळे अशी आरोपींची नावे आहेत. कळे येथे संदिप कांबळे हा बनावट छपाई करीत होता तर तिघे त्यास मदत करीत होते.पोलिसांनी मरळी फाटा ता.पन्हाळा येथे कारवाई करून क्रेटा कार .संगणक व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक दिवसांपासून ही टोळी कार्यरत आसावी असा पोलीसांचा अंदाज आहे. पोलीस निरीक्षक संजय गोरले, शेष मोरे, अवधूत गुरखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या घटनेनंतर कळे परीसरात खळबळ उडाली आहे.
