जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर…

मुंबई : जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

२३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई येथील रंगशारदा सभागृह होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ.सदानंद राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,पालकमंत्री दिपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.डॉ .सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत हे मागील तीन दशके ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देत आहेत. हृदयविकार, सर्पदंश, विषबाधा झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे.केरळमधील पूरग्रस्तांसाठी अठरा लाख रुपयांची सर्पदंशावरील लस मोफत पुरविली होती. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कुपोषण , सर्पदंश प्रतिबंधासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करत आहेत.या कार्याची दखल घेऊन मागील वर्षी डॉ. राऊत यांना इंडियन मेडिकल असोशिएशन ( आयएमए) च्या वतीने प्रतिष्ठित डॉ.ज्योती प्रशाद गांगुली या राष्ट्रीय पुरस्काराने तसेच शिवजयंती निमित्त राज्य शासनाच्या वतीने शिवनेर भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

🤙 8080365706