कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना मोर्चा..

यवतमाळः हरिद्वार येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. कालिचरण महाराजांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

लव्ह जिहाद, गो हत्या बंदी, धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी हा हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला. आमदार निलेश नाईक यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला.श्रीराम चंद्राच्या कृपेने सकल हिंदु समाजाने हा मोर्चा काढल्याची प्रतिक्रिया निलेश नाईक यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं निलेश नाईक यांनी सांगितलं.जातीयवाद तोडा, वर्णवाद तोडा, सनातनवाद जोडा… सगळ्या हिंदूंनी एक व्हावं आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराजांनी मोर्चाच्या वेळी दिली.

🤙 8080365706