
वर्धा : जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसला असून बळीराजा संकटात सापडला आहे.

वर्धा जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या सुमारास देवळी तालुक्याच्या इंजाला, सोनोरा, चोंडी, आकोली, लोणी, आगारगाव, पुलगाव तर आर्वी तालुक्याच्या सोरटा, वडाळा, पिंपळगाव या गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या पिकांचे तसेच काढून ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे परिसरातील कपाशीच्या पिकांसह गहू, हरभरा आणि तूर पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणी पुरामुळे शेतकरी हवालदील झाला होता. तर आता रब्बी हंगामात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले. यामुळे आता शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
