इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले छ. संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या बदनामीचे कसे षडयंत्र रचले…

मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे यांना धर्मवीर न म्हणता त्यांना स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.त्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी बोलताना इतिहासातील बखरकारांनी मांडलेला इतिहास आणि इतिहासात छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या बदनामीचे कसे षडयंत्र रचले गेले तेही त्यांनी बखर, नाटकांचा संदर्भ देत सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवछत्रपती ही त्यांनी लावून घेतलेली पदवी होती. शिवाजी महाराजांना एका धर्माचे रक्षक म्हणून पुढं आणणे चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. संभाजीराजे हे धर्मवीर होते, मात्र त्यांना कोणता धर्म अपेक्षित होता हे माहिती करून घेणेही महत्वाचे आहे.इतिहासातील समकालीन साधनातून मराठाधर्म, महाराष्ट्रधर्म हा अपेक्षित होता. त्यामुळे महाराष्ट्र धर्माबरोबर हिंदू धर्म नव्हता असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कारण त्याकाळी मिर्जाराजा जयसिंगसारख्या हिंदू राजानेही त्याकाळी स्वराज्यावर चालून आलेले अनेक हिंदू राजे होते.त्यामुळे एका धर्मासाठी संभाजीराजे यांना पुढं आणणं चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. जेधे शेखावली, महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते.छत्रपती संभाजीराजे यांना बदनामी करणारे विशिष्ट केंद्र आहेत. त्यांच्याकडूनच ही बदनामी सुरू झाली आहे असा जोरदार हल्लाबोल इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

🤙 8080365706