रश्मी ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल होणार

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं.रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

🤙 8080365706