वडणगेत अटीतटीच्या लढतीत तीन ठिकाणी सत्तांतर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वडणगे मतदार संघांतर्गत येणाऱ्या वडणगे आंबेवाडी प्रयाग चिखली वरणगे आणि पाडळी या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून पाच ग्रामपंचायती पैकी वडणगे, आंबेवाडी तसेच वरणगे या तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदा सह निर्विवाद सत्तांतर झाले.

पाडळी बुद्रुक येथे सत्तारूढ आणि विरोधक एकत्र येऊन केलेल्या शिवशाही पॅनेलची सत्ता आली तर प्रयाग चिखली येथे सत्तारूढ चव्हाटा पॅनलला नऊ जागा तर विरोधी बांसंगमेश्वर पॅनलला सहा जागा आणि सरपंच पद मिळाले.अत्यंत अटीतटीच्या लढती आणि चुरशीने मतदान झालेल्या या पाच पंचायतीच्या निकालाकडे परिसराचे लक्ष लागले होते.

वडणगेत मास्तर पॅनेल ची बाजी

वडणगे येथे झालेल्या प्रमुख दोन पॅनेल मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत येथील मास्तर गटाला सतरा जागा पैकी सरपंच पदासह 14 जागा मिळाल्याने या गटाचे ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत सिद्ध झाले तर सत्तारुढ पाटील गटाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. लोकनियुक्त सरपंच म्हणून पॅनेल प्रमुख सदाशिव मास्तर यांच्या सून सौ संगीता शहाजी पाटील या विजयी झाल्या आहेत.

प्रयाग चिखलीत एकीकडे सरपंचपद तर सत्ता दुसऱ्याला

प्रयाग चिखली येथे गोकुळचे संचालक एस आर पाटील यांच्या चव्हाटा पॅनल पर्यायाने सत्तारुढांना नऊ जागांसह बहुमत तर विरोधी रघुनाथ पाटील पांडबा यादव आणि संभाजीराव पाटील (भाजपा) यांच्या बाण संगमेश्वर पॅनेलला सरपंच पद आणि सहा जागा मिळाल्या. पॅनल प्रमुख रघुनाथ पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे 231 मतांनी विजयी झाले आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार सत्तारुढ पॅनेल प्रमुख एस आर पाटील यांचे ज्येष्ठ बंधू हंबीरराव पाटील हे पराभूत झाले आहेतया ठिकाणी रघुनाथ पाटील गटाने सरपंच पद मिळाल्यामुळे तर एस आर पाटील गटाने बहुमत मिळाल्याने जल्लोष केला.

वरणगेत सत्तांतर:

युवराजशिंदे सरपंचपदी विजयीवरणगे येथे अनेक स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन सत्ता रोडांच्या विरोधात बांधलेल्या भैरवनाथ विकास आघाडीने सरपंच पदासह 14 जागा जिंकत एकतर्फी सत्ता हस्तगत केली तर करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकराव पाटील तसेच मार्केट कमिटीचे माजी संचालक पै. मारुती ढेरे यांच्या सत्तारूढ भैरवनाथ पॅनलला एक ही जागा मिळाली नाही. अमित शंकरराव पाटील यांनाही पराभव पत्करावा लागला.गावचे नूतन लोकनियुक्त सरपंच पदी युवराज शिंदे हे विजयी झालेविजयी आघाडी पॅनलचे नेतृत्व कुंभीचे माजी संचालक बळवंत पाटील शिवसेनेचे तानाजी आंग्रे माजी सरपंच- नामदेव पाटील विलास पाटील रामकृष्ण पाटील धनाजी पाटील व सहकाऱ्यांनी केले.

पाडळी बुद्रुक संयुक्त शिव शाहू पॅनलचा विजय

पाडळी बुद्रुक गावातील पी डी पाटील गट आणि गायकवाड गट हे दोन पारंपारिक विरोधी गट ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आणि बिनविरोधाच्या तडजोडी केल्या मात्र या तडजोडी मान्य नसलेल्या एका परिवर्तन गटाने परिवर्तन पॅनल ची घोषणा केली या पॅनेलचे नेतृत्व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश राऊत अशोक पाटील संजय पाटील व सहकाऱ्यांनी केले दुसरीकडे एकत्र आलेल्या दोन पारंपारिक गटाच्या वतीने शिवशाहू आघाडी नावाने पॅनेल उभा केले निवडणुकीत शिवशाही पॅनलचे सरपंच पदासह नऊ सदस्य निवडून आले तर विरोधी परिवर्तन पॅनेल ला एका जागेवर समाधान मानावे लागलेसरपंच पदे शिव शाहू पॅनेलचे उमेदवार शिवाजी दत्तात्रय गायकवाड हे 482 मताधिक्याने विजयी झालेया निवडणुकीने गावातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे स्पष्ट झाले.

आंबेवाडीत निर्विवाद सत्तांतर :

सुनंदा मारुती पाटील सरपंच पदी आंबेवाडी येथील सत्तारूढ पंचगंगा आघाडी चा दारुण पराभव करत येथील माजी सरपंच एम जी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने सरपंच पदासह नऊ जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले.विरोधी पंचगंगा पॅनलचे विक्रम राजेंद्र अतितकर हे एकमेव सदस्य विजयी झाले लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार सुषमा रघुनाथ जाधव यांचा पराभव झाला.

🤙 8080365706