
शिये वार्ताहर: सादळे – मादळे (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्यापंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार पंडित बिडकर यांनी २६१ मते मिळवून बाबासो पाटील यांचा ७ मतांनी पराभव करून बाजी मारली.


दोन सदस्य बिनविरोध झाल्याने पाच सदस्य पदांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार व कंसात मते पुढीलप्रमाणे :
वर्षा मादळेकर ( १६९),छाया पोवार ( १३९),गोरखनाथ बुचडे (१८९), सतीश चौगले (१६६),सुजाता पाटील (१८९) तर सौ.अश्विनी कांबळे व सौ.भारती पाटील या बिनविरोध झाल्या आहेत.समृद्ध पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले आहेत.तर एक अपक्ष निवडून आला आहे तर दोन बिनविरोध झाले आहेत.त्यामुळे सत्तेसाठी कोण – कोण एकत्र येणार याकडे लक्ष लागले आहे.