
गगनबावडा : संभाजी सुतार
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४२९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून मतमोजणी पुर्ण झाली . जिल्ह्यातील निवडणुकीतील कल स्पष्ट झाले आहेत.
त्यापैकी गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायती पैकी ३ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या तर १८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली. यामध्ये ३ सरपंच बिनविरोध तर ३ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लागली व १५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी थेट निवडणूक लागली यामध्ये तिसंगी येथे जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील विरुद्ध बंकट थोडगे यांची समविचारी स्थानिक आघाडी यांच्यात काट्याची टक्कर अशी लढत पाहायला मिळाली यामध्ये समविचारी स्थानिक आघाडी पॅनेलचे सर्जेराव पाटील हे २२२ मतांनी विजयी झाले. खोकुर्ले येथे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली यामध्ये नाना पाटील गटाची सुनिता कांबळे यांचा ३६३ मतांनी विजयी झाल्या .
खेरीवडे येथेही काँग्रेस विरूद्ध काँगेस अशी लढत झाली यामध्ये शारदा पाटील या ९७ मतांनी विजयी झाल्या .जर्गी सुलाबाई आंबुस्कर या १४६ मतांनी विजयी झाल्या . धुंदवडे येथे काँग्रेसचे मारुती पाटील (एमजी) हे ५६९ मतांनी विजयी झाले.
शेळोशी येथे भारती कांबळे या २७० मतांनी विजयी झाल्या. बोरबेट येथे शिवसेनेचे संतोष पाटील हे उमेदवार सरपंच पदासाठी १३९ मतांनी विजयी झाले.
साखरी/म्हाळुंगे येथे एकून ४ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते त्यापैकी किरण कांबळे यांचा १६८ मतांनी विजयी झाले.
मणदूर येथे ही काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली यामध्ये दत्ता (अण्णा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा सरपंच पदाचा उमेदवार नामदेव कांबळे ९३ मतांनी विजयी कडवे – रेश्मा परीट (काँग्रेस )बावेली – सागर सावंत (काँग्रेस) मांडुकली – राजाराम तुकाराम पाटील ( काँग्रेस ) तळये बुद्रक – केरबा दादू पाटील ( काँग्रेस) असेच २१ ग्रामपंचायती पैकी गगनबावडा तालुक्यात १९ ग्रामपंचायती मध्ये सतेज पाटील यांचाच बोलबाला झाला .बिनविरोध सरपंच१) शोभा विलास पाटील (कोदे) काँग्रेस२) परशराम खानविलकर (मार्गेवाडी) काँग्रेस३) सरिता पाटील (अनदूर) काँग्रेस४) वैशाली गावकर (असळज) काँग्रेस५) उज्वला पाटील (शेणवडे) काँग्रेस६) संतोष गुरव (वेसर्डे) शिवसेना.
चौकट : –