पाचगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. प्रियांका संग्राम पाटील….

कोल्‍हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले असून सरपंचपदी सौ. प्रियांका संग्राम पाटील यांची निवड झाली.

यापूर्वी ग्रामपंचायतीवर सतेज पाटील गटाचे वर्चस्‍व होते. परंतु त्या गटाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न महाडिक गटाकडून झाला. ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी ९ जागा काँग्रेसने तर आठ जागा भाजपने जिंकल्या.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने आपली सत्ता अबाधित ठेवून, सरपंचपदी आनंदा कांबळे हे निवडून आले आहेत, पंधरापैकी ३ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेसने १३ जागांवर तर भाजपने २ जागांवर विजय मिळवला.

🤙 9921334545