
नागपूर : आज सोमवार पासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ’50 खोके, एकदम ओके..’ अशा घोषणा देण्यात आल्या आहे.

यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले.