
कोल्हपूर : प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार असा सवाल विचारत एकदा डॉक्टर झाला की सेवा करायचे विसरून जाता असे खडेबोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुनावले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आज, शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सकाळी सीपीआरमध्ये बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक स्वभावाची ओळख करून दिली. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते.
