हिवाळ्यात गूळ- फुटाणे खाण्याचे फायदे…..

आरोग्य टीप्स: पौष्टिकतेच्या बाबतीत सुकामेव्याच्याच बरोबरीचे असणारे पदार्थ खायला आपण विसरून जातो. अशा पदार्थांपैकीच २ पदार्थ म्हणजे गूळ आणि फुटाणे. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यातलं अतिशय उत्तम टॉनिक आहे.

गूळ- फुटाणे खाण्याचे फायदे

फुटाणे हा प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो.

याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात फोलेट, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम असतात.. गुळामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं अतिशय लाभदायी ठरतं.

लोह वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो.

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. फुटाण्यामध्ये कॅल्शियम असल्याने हिवाळ्यातली सांधेदुखी फुटाणे खाल्ल्याने कमी होऊ शकते.