फुटबॉलपटू निखिलच्या उपचाराची सर्व जबाबदारी : डी. वाय. पाटील ग्रुप घेणार..

कोल्हापूर : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखील खाडे हा बरा होईपर्यतची उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप घेणार आहे.

आज तज्ञ डॉक्टरांसह कुटुंबीय आणि नातेवाईकांशी निखिलवरील उपचारा बाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुप निखिलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दरम्यान डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलच्या वडिलांकडे देण्यात आली. निखिलवरील शस्त्रक्रियेबाबत माहिती मिळताच तात्काळ सिटी हॉस्पिटलमध्ये त्याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच गेली आठ दिवस निखिलचे कुटुंबीय आणि डॉक्टर यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो.

आज खाडे कुटुंबियांशी मेंदू वरील तज्ञ डॉक्टरांसोबत निखिलच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्याच्या उपचार व खर्चाची कोणतीही काळजी करू नका. ती जबाबदारी आम्ही घेऊ. कुटुंबीयांनी त्याला भक्कम मानसिक आधार द्यावा, असे त्याच्या कुटुंबियांना सांगितले. सर्वांच्या सदिच्छा निखिलला निश्चितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी बळ देतील.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे,प्राचार्य डॉ.महादेव नरके रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डी. डी. पाटील, मेंदू तज्ञ डॉ. उदय घाटे, दिलीप खाडे, अॅड. अभिजित नलवडे, पवन पाटीलअजित पाटील, प्रा.योगेश चौगले, विराज पसारे, अर्जुन पोवाळकर, अक्षय भोसले, आदी उपस्थित होते.