
कोल्हापूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस ग्रांऊड बावडा कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी उपस्थित पाहुणे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामुहिक क्रीडा शपथ घेत संविधानाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेवेळी चेतना विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी ज्युदो प्रात्यक्षिके तसेच पेठवडगाव कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक बाटेसार तसेच सचिन साठे – सहाय्यक आयुक्त जातपडताळणी कार्यालय, कोल्हापूर तसेच रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूरचे प्रेसिडेंह संजय सागेखे, सेक्रेटरी सागर बकरे आणि इव्हेन्ट चेअरमन अजित जाधव, तसेच झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे नरेंद्र झंवर आदी उपस्थिती होते.
