
थंडी म्हटली की आवर्जून डिंकाचे, सुकामेव्याचे आणि अळीवाचे लाडू केले जातात. थंडीत शरीराला उष्णता देणारे लाडू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. पारंपरिक सूपर फूड म्हणून ओळखले जाणारे हे लाडू आवर्जून खायला हवेत.ही घ्या सोपी रेसिपी.
साहित्य – १. अळीव – अर्धी वाटी २. गूळ – १.५ वाटी ३. ओलं खोबरं – २ ते ३ वाट्या ४. तूप – १ चमचा
कृती – १. रात्रभर अळीव नारळाच्या पाण्यात भिजत घाला. नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात भिजत घातले तरी चालते. सकाळी हे अळीव जवळपास तिपटीने फुगतात. २. कढईमध्ये तूप घालून त्यात अळीव आणि खोबरं घालायचं. हे दोन्ही चांगले एकजीव होऊ द्यायचे. ३. मग यामध्ये गूळ घालून हे मिश्रण सतत हलवत राहायचे. कढईला चिकटू नये म्हणून गॅस बारीक करुन हे मिश्रण हलवायचे. ४. साधारणपणे १५ ते २० मिनीटे एकजीव झाले की गॅस बंद करुन कढई खाली उतरवून ठेवायची. ५. थोडे गार झाले की याचे एकसारखे लाडू वळायचे. आवडीनुसार यामध्ये बदाम किंवा काजूचे काप घालू शकतो.
